आमडोशी येथे दासबोध सप्ताह

। सुकेळी । वार्ताहर ।

आमडोशी येथे समर्थ सद्गुरु ताईसाहेब महाराज यांची 28 वी पुण्यतिथी व अखंड दासबोध सप्ताहाचा कार्यक्रम गुरुवर्य गुरुदास अनंत महाराज यांच्या हस्ते दि.27 ते 29 मे रोजी पार पडणार आहे.

या कार्यक्रमाची सोमवारी माऊलींची पाद्यपूजा, भजन, अखंड दासबोध नामसप्ताहाने सुरुवात होणार आहे. तसेच, या तीन दिवसांमध्ये गुरुदास अनंत महाराज, राजाभाऊ पांचाळ, गुरुभगिनी उषाताई कुलकर्णी, चव्हाण महाराज, हनुमंत निंबाळकर, लोकम गुरुजी यांचे प्रवचन होतील. तसेच, अंकुश कदम यांची किर्तन सेवा होणार आहे. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहुन सहकार्य करण्याचे आवाहन अनंत महाराज व गणेश जाधव यांनी केले आहे.

Exit mobile version