पुगाव येथे दत्त जन्मोत्सव सोहळा

| कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील पुगांव गावामधील श्रीक्षेत्र दत्तमंदिर येथे सालाबादप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध गुरुवार दि.12 ते 15 डिसेंबरपर्यंत योगीराज दत्त जन्मोत्सव व अखंड हरीनाम यज्ञ सोहळा साजरा होणार आहे.

या निमित्ताने रोज सकाळी काकड आरती, सकाळी 9.30 पंचरत्न गीता व अखंड ज्ञानेश्‍वरीचे पारायण होणार आहे तसेच गुरुवार दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते 8 घटस्थापना श्री व सौ. सुषमाताई सुभाष देशमुख यांच्या हस्ते, सकाळी 8.00 ध्वजरोहण, सायं. 5 ते 6 ह.भ.प. चंद्रकांत महाराज बरे यांचे प्रवचन, 6 ते 7 हरिपाठ, 7 ते 9 ह.भ.प बबन महाराज कडू यांचे कीर्तन, रात्री पुई, पुगाव यांचे हरिजागरण, शुक्रवार 13 डिसेंबर रोजी सायं. 5 ते 6 ह.भ.प.दत्ता महाराज मांडवकर यांचे प्रवचन, 6 ते 7 ह.भ.प.किरण महाराज कुंभार यांचे कीर्तन, रात्री पुई, पुगाव ग्रामस्थ यांचे जागरण, शनिवार दि.5. दु. 3 ते 6 वा. संप्रदाय भा.गु. जनार्दन स्वामी यांचे कीर्तन, तसेच रात्री 9 ते 11 बबन महाराज वांजळे यांचे कीर्तन होईल. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सद्गुरु पद्मानाभाचार्य अमृतनाथ शिष्य संप्रदायाची कार्यकारी कमेटी, समस्त पुगांव ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण वर्ग खांब व कोलाड पंचक्रोशी मेहनत घेत आहेत.

Exit mobile version