| तळा | प्रतिनिधी |
तळे बाजारपेठ कासारआळी येथे श्री गुरुदेव दत्त मंदिरात गेले 33 वर्षे दत्त जयंती उत्सव व इतर अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम आनंदी वातावरणात साजरे करण्यात येत आहेत. बुधवारी (दि.3) श्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन आनंदात साजरा करीत असताना सकाळी 5.30 वाजता काकड आरती, त्यानंतर 9.30 वा श्री सत्यदत्त पूजा, दुपारी आरती, त्यानंतर महाप्रसाद देण्यात आला. जवळपास 400 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी 5.00 वाजता तीर्थ प्रसाद त्यानंतर भोईरवाडी तळा येथील महिला मंडळाचा बहारदार भजनाचा कार्यक्रम पार पडला. हभप प्रगती रिसबुड व ह भ प लक्ष्मण शिंदे त्यांना मृदुंग साथ किरण सातांबेकर यांची लाभली.
गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता श्री गुरुदत्त जन्मोत्सव किर्तन हभप अवनी धनंजय गद्रे सुधागड पाली यांचे सुश्राव्य कीर्तन त्यांना हार्मोनियमची साथ भरत चव्हाण तर तबला साथ किरण सातांबेकर यांची लाभली. अतिशय सुंदर कीर्तनाचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. त्यानंतर तीर्थप्रसाद रात्रो 10.00 वाजता स्थानिक मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंदिराच्या उत्सवासाठी देणगी देणाऱ्यांचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला.







