| नेरळ | वार्ताहर |
नेरळ येथील चिंचआळी परिसरात असलेल्या श्री गुरुदत्त मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दत्त जयंतीनिमित्ताने तीन दिवसांचे अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन केले होते. श्री गुरुदत्त मंदिर येथे 26 वर्षे श्री दत्त जयंती सोहळा आयोजित केला जातो.23 ते 26 डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.वारकरी संप्रदाय मंडळ नेरळ आणि परिसर तसेच श्री विठ्ठल रखुमाई मंडळ गारपोली, श्री विठ्ठल रखुमाई हरिपाठ मंडळ कोल्हारे यांनी हरिपाठ सादर केला. तर श्रीपतीबाबा भजन मंडळ डिकसळ आणि आई तुळजा भवानी भजन मंडळ जिते यांनी भजनाची सेवा दिली. मंडळाचे शरद गवळी, कचरू बदे, धोंडू तरे, मारुती बदे, कैलास डांगरे, दिनेश हजारे, जगदीश चव्हाण, संजय गवळी, महेश कदम, मंगेश कदम, कृष्णा भोईर आणि दिनकर बदे आदीने अखंड हरिनाम सोहळा आयोजित केला होता.