माणगाव प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी दत्ताराम शिर्के


| माणगाव | वार्ताहर |

अखिल प्राथमिक शिक्षक संघाची सभा पेण येथे बुधवारी(दि. 17) संघाचे राज्यध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थतीत संपन्न झाली. या सभेत अखिल माणगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी माणगाव येथील दत्ताराम अर्जुन शिर्के यांची निवड संघाचे जिल्हाध्यक्ष सोपान चांदे यांनी जाहीर केली. या सभेला संघाचे जिल्हाध्यक्ष सोपान चांदे, सरचिटणीस किशोर पाटील, पनवेलचे विनोद जोशी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यांची अखिल माणगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष गणेश निजापकर, रमेश उभारे, सुहास चांदोरकर, नरेश सावंत, उदय गायकवाड, अंकुश महाडिक यांच्यासह माणगाव तालुक्यातील शिक्षकांनी तसेच एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोशिएशनचे संस्थापक राहुल दसवते, नयन दसवते, भाई दसवते , फहद करबेलकर, विनेश मोरे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version