बाल हक्कांसाठी डेव्हिड बॅकहम मैदानात

युनिसेफसोबत मिळून देतोय लाखमोलाचं योगदान
| मुंबई | प्रतिनिधी |
इंग्लंडचा महान फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम भारतात आला आहे. बॅकहम 2005 पासून युनिसेफमध्ये गुडविल ॲम्बेसेडर म्हणून जोडला गेला आहे. बॅकहम गुजरातमधील मुलांसोबत क्रिकेट आणि फुटबॉल खेळतानाचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

मुंबईत येण्यापूर्वी डेव्हिड बेकहॅम गुजरात दौऱ्यावर होता. येथे तो युनिसेफकडून बालहक्क आणि लैंगिक समानतेच्या समर्थनासाठी देशाचा दौरा करत आहे. बॅकहमने गुजरातमध्ये अहमदाबादसह काही जिल्ह्यांचा दौरा केला.तसेच यावेळी बॅकहमने मुलांना शालेय शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या आणि बालविवाह, बालमजुरीचा विरोध करण्यासाठी सक्षम बनवणाऱ्या लोकांच्या भेटी घेतल्या.

बॅकहॅमने गुजरात भेटीचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ‘युनिसेफ मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी करत असलेले काम प्रथमदर्शनी पाहणे हा एक मोठा विशेषाधिकार आहे. मी येथे पाहिलेली ऊर्जा आणि नाविन्य खूप प्रेरणादायी आहे. मला मुलांच्या गोष्टी आणि त्यांची भविष्यातील स्वप्ने ऐकायला खूप मजा आली,’ असे डेव्हिड बॅकहम म्हणाला.

Exit mobile version