यशश्रीचा मारेकरी दाऊदला ठोकल्या बेड्या

| उरण | वार्ताहर |

उरण येथील 20 वर्षीय यशश्री शिंदे खूनप्रकरणी आरोपी दाऊद शेख याला नवी मुंबईतील उरण पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. त्याला गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूरच्या अल्लर येथून ताब्यात आले. संशयित आरोपीच्या चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे आज मंगळवारी दिली.

उरणमध्ये यशश्री शिंदे हिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यशश्री शिंदे ही 25 जुलैपासून बेपत्ता झाली होती आणि त्यानंतर शनिवारी तिचा मृतदेह नवी मुंबईतील उरण येथील कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळला होता. तिच्या शरीरावर भोसकलेल्या अनेक जखमा आढळून आल्या होत्या. तिच्या गुप्तांगावर चाकून वार करण्यात आले होते. तिच्या शरीराचे कुत्र्यांनी लचके तोडल्याचे आढळून आले होते. यशश्रीचा खून करणार्‍या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. मात्र, आरोपी पोलिसांना चकवा देत होता. तो सतत लोकेशन सतत बदलत होता. त्याचे लोकेशन सापडत नव्हते. पण, गुलबर्गा जिल्ह्यातील अल्लर, शहापूर येथून मुख्य संशयित आरोपी दाऊद शेख याला अटक केल्याचे दीपक साकोरे यांनी सांगितले.

मोहसीन नावाचा व्यक्ती मयत मुलीच्या संपर्कात होता. आम्ही 3 ते 4 संशयितांची चौकशी केली. पण मुख्य संशयित दाऊदची चौकशी केल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली आहे. मयत मुलगी आणि संशयित यांच्यात मैत्री होती. पण मागील 3 ते 4 वर्षे मयत संशयिताच्या संपर्कात नव्हती. त्यातून त्याने हत्या केली असावी, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी मुख्य संशयिताची चौकशी अजून पर्ण झालेली नाही. दरम्यान, पोस्टमार्टम डॉक्टरांशी केलेल्या चर्चेनुसार, भोसकलेल्या जखमा गंभीर स्वरुपाच्या होत्या. तर चेहर्‍यावरील जखमा ह्या कुत्र्यांनी ओरबडल्यामुळे झाल्या असाव्यात. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर ही घटना घडली असावी, अशी शक्यता आहे. दोघांचा संपर्क झाला आणि एकमेकांना भेटायचे ठरवले होते. तिचे अपहरण करण्यात आले नव्हते, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले. यापूर्वी याप्रकरणी कर्नाटकातील मोहसीन नावाच्या एका व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो यशश्रीच्या सतत संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना फोन कॉल डिटेल्सवरून मिळाली होती. दरम्यान, दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून, उरण येथे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याची इथेच मयत यशश्रीशी भेट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, याच मुलीच्या संदर्भात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातच त्याला तुरुंगवासही झाला होता. काही महिन्यांपूर्वी तो बाहेर आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुलीच्या संपर्कात येऊन ठरवून त्याने तिचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.

Exit mobile version