लोकलमध्ये आढळला मृतदेह

| पनवेल । वार्ताहर ।

पनवेल रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबतची नोंद पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस तिच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. सदर अनोळखी महिलेचे अंदाजे वय 55 वर्षे असून उंची 4 फूट 5 इंच, अंगाने सडपातळ, रंग गहूवर्ण, डोकीचे केस वाढलेले, डोळे अर्धवट मिटलेले, नाक सरळ आहे. मयत महिलेच्या डाव्या हातावर अक्षरे गोंदलेले असून ते अस्पष्ट दिसत असल्याने समजून येत नाही. तसेच उजव्या हाताच्या पोटरीवर दोन चिन्ह गोंदलेले आहेत. तसेच अंगात पोपटी रंगाचा हाफ टी शर्ट घातलेला आहे. सदर महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाणे किंवा पोलीस निरीक्षक बी.व्ही. दोडमिसे यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version