लाडकी बहीण संभ्रमात

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात झाली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. परंतु, योजना जाहीर होऊन चार दिवस झाले तरी पोर्टल अद्याप सुरु होत नाही. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमवण्यासाठी सलग तिसर्‍या दिवशी महिला व काहींचे पती शासन दरबारी फेर्‍या मारुन कागदपत्रे गोळा करून ठेवली पण हे कागदपत्रे ऑफलाईन पद्धतीने भरायचे की ऑनलाईन भरायचे, हे ही माहित नसल्याने महिला संभ्रमात पडल्या आहेत. या संदर्भात नायब तहसीलदार संजय तवर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, ऑफलाईन अर्ज कोण स्विकारणार या संदर्भात माहिती नाही आहे. परंतु, सेतू सुविधा केंद्रामध्ये होवू शकतो. परंतु, त्याचे ही निर्देश आले नाहीत, अशी माहिती त्यांनी दली.

Exit mobile version