बॅ. अंतुलेंचा आंबेत येथे स्मृती दिन साजरा

। आंबेत । वार्ताहर ।
बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादळी व्यक्तिमत्त्व. अवघ्या 18 महिन्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत त्यांनी आपली छाप महाराष्ट्रासह देशात पाडली होती. प्रवाहाच्या विरोधात पोहण्याची सवय असलेल्या अंतुले यांनी पक्षांतर्गत विरोधकांशी दोन हात करत पक्षात आपली ताकद मजबूत केली होती. बॅ ए आर अंतुलेच्या सातव्य स्मृती दिनानिमित्त त्यांच्या मूळ गावात त्यांच्या कबरीवर चादर टाकून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रायगड आणि रत्नागिरी सीमेवर असलेल्या आंबेत चेक पोस्ट जवळून अंतुलेच्या निवास स्थानी जाणार्‍या मुख्य मार्गावर नाम फळकाच देखील अनावरण करण्यात आले यावेळी अंतुले समर्थक अब्रार अमीन झटाम सह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version