तलावात बुडून मृत्यू
| रसायनी | वार्ताहर |
गटारी साजरी करण्यासाठी आलेल्या धारावी मुंबई येथील विनोद निरंजन गजाकोष (42) याचा चौक हद्दीतील नढाळ पळस येथील तलावात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सोमवारी सापडला. खोल तलावात पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तहसीलदार आयुब तांबोळी यांनी चौक मंडळ अधिकारी किरण पाटील यांना घटनास्थळी मदत कार्य करण्यास निर्देश दिले. चौक सहायक पोलिस निरीक्षक युवराज सुर्यवंशी हेही दाखल झाले. अपघातग्रस्त पथकाचे प्रमुख गुरूनाथ साठेलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेोध मोहीम सुरू केली. सोमवारी सकाळी सात वाजून दोन मिनिटांनी गुरूनाथ साठेलकर व त्यांची टीम खोल तलावात पाण्यातील कॅमेरा घेऊन उतरली. तीन तासाच्या अथक प्रयत्नाने विनोदचा मृतदेह हाती लागला.