| पनवेल | वार्ताहर |
कंपनीतून घरी परतणार्या तरुणाच्या स्कूटीला पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात जखमी झाल्याने तरूणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तळोजा पोलिसांनी या अपघाताप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव शुभम म्हात्रे (27) असे असून तो नावडे गावात रहात होता.






