शॉक लागून बैलाचा मृत्यू

। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

माजगांव येथे राहणारे महेश पाटील (ढवाळकर) यांच्या घराच्या पाठीमागे गुरांचा गोठा आहे. तेथील विजेचा पोलाचा शॉक लागून गोठ्यातील बैलाचा जागीच मृत्यू झाल्याने कुटुंबावरती दुखाचे सावट पसरले आहे. भात शेतीची कामे सुरु असताना ही दुर्देवी घटना घडल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
याबाबतची माहिती मिळताच ग्रामस्थांनी बैलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र बैलाचा जागीच मृत्यू झाला. विषेश म्हणजे दिवाळी सण असल्यामुळे लहान मुले याच ठिकाणी खेळत असल्याचे समजते. सुदैवाने मुले या पोलाच्या संपर्कात न आल्यामुळे मोठी जिवितहानी टळली. सध्या शेतीचे काम सुरु असताना शेतकरी वर्गांचा बैल विजेच्या धक्याने मृत्यू झाल्यामुळे आता शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

घराच्या पाठीमागे गोठा असून याच ठिकाणी विजेचा पोल आहे. पोलाच्या संपर्कात येताच विजेचा शॉक लागला. बैलाला बाजुला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हालाही विजेचा धक्का बसत होता.

महेश पाटील (ढवाळकर),
बैल मालक, माजगाव

विजेचा शॉक लागल्याने बैलाचा मृत्यू झाल्याचे समजले. मृत्यूच्या अहवालात तसे नमुद झाल्यास आम्ही शेतकरी वर्गांस नुकसान भरापाई देण्याचा प्रयत्न करु.

अभिजित बोधनकर,
अभियंता, एमएसईबी चौक

माजगाव येथे बैलाचा मृत्यू झाल्यांची माहिती आम्हास मिळाली असता आम्ही त्या ठिकाणी जाऊन तातडीने तपासणी केली. त्यावेळी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे समोर आले असून तसा अहवाल आम्ही पुढे पाठविणार आहोत.

प्रशांत कोकरे,
पशु वैद्यकीय अधिकारी

Exit mobile version