| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील कोल या गावाजवळ असलेल्या श्रीराम स्टोन क्रशर या दगडाच्या खाणीमध्ये शुक्रवारी संध्याकाळी डंपर आणि क्रशर यामध्ये सापडून एक मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अनिल पवार (49) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून, पोलिसांनी केवळ डंपर चालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक क्रशर मालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला असल्याची चर्चा कोल परिसरामध्ये करण्यात येत असून, क्रशर मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.