लोडरच्या चाकाखाली कामगाराचा मृत्यू

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील जयगड येथील आंग्रे पोर्टजवळ चालकाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा लोडरच्या मागील चाकाखाली येऊन मृत्यू झाला. दिवाकर भूषण पासवान (45, मूळ रा. बिहार सध्या रा. आंग्रे पोर्ट, सांडेलावगण, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी लोडर चालक सनोज कुमार विरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच्या विरोधात मयत कामगाराचा मुलगा दिलखुष दिवाकर पासवान (18) याने जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सकाळी 5 वा. त्याचे वडील आंग्रे पोर्ट येथे लोडरमधून साखरेची पोती उतरवत होते. त्यावेळी सनोजकुमार लोडर मागे घेत असताना लोडरच्या मागील चाकाखाली येऊन दिवाकर पासवानचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस हवालदार रमेश गावित करत आहेत.

Exit mobile version