मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

| पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. येथील कष्टकरी, श्रमजीवी, मजूर,मत्स्यव्यवसाईक व हातावर पोट असलेला श्रमिक वर्ग पोटापाण्यासाठी अविरत कष्ट उपसत असतो. असेच उदरनिर्वाहासाठी मासेमारीकरीता गेलेल्या शिळोशी गावचे पुलाजवळ अंबाजोड नदीच्या पाण्यात मासेमारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा 30 जानेवारी रोजी पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पांडुरंग दळवी(25 ) रा. टेम्भी वसाहत सुधागड, असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी पाली पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यू नोंद झाली असून पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक विश्‍वजित काईनगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Exit mobile version