मुख्यालयातील मेसमधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

 अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग येथील पोलीस मुख्यालयातील मेसमधील एका कर्मचाऱ्याचा सोमवारी सायंकाळी आकस्मात मृत्यू झाला. ही घटना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पुंडलिक मुदगण (47) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा कर्मचारी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील मूळचा रहिवासी आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो पोलीस मुख्यालयातील मेसमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. सध्या चेंढरे येथील शासकीय वसाहतीमध्ये तो राहात होता. सोमवारी सायंकाळी अचानक त्याला फिट आली. तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार  सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती अलिबाग पोलिसांनी दिली. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद अलिबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version