बाळकृष्ण मुळे यांचे निधन

। तळा । वार्ताहर ।
तळा येथील श्रीदेव राधाकृष्ण नामदेव शिंपी समाजाचे विश्‍वस्त बाळकृष्ण गोविंद मुळे यांचे वयाच्या 72 व्या वर्षी अल्पशा आजाराने रविवारी रात्री निधन झाले. बाळकृष्ण मुळे हे 47 वर्षे पेपर एजंट तसेच 50 वर्षे हॉटेल व्यासायिक म्हणून नावारूपाला आले होते. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, दोन मुली, सुनबाई, नातवंड, तीन भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी बुधवारी (दि.4 मे) व उत्तरकार्य शुक्रवारी (दि.6 मे) तळा येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

Exit mobile version