ग्रॅहम थॉर्प यांचे निधन

। लंडन । वृत्तसंस्था ।

इंग्लंडचे माजी दिग्गज फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचे निधन झाले. ग्रॅहम थॉर्प हे दीर्घकाळ आजारी होते. परंतु, त्यांच्या आजाराचा खुलासा झालेला नाही. याबाबत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत सोशल मीडियावर सोमवारी (दि.5) ही माहिती शेअर करण्यात आली.

ग्रॅहम थॉर्पने इंग्लंडकडून जवळपास 100 कसोटी सामने खेळले, ज्यात 6744 धावा केल्या आहेत. यादरम्यान 16 शतके आणि 39 अर्धशतके त्यांच्या नावावर आहेत. तर, इंग्लंडसाठी 82 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी 21 अर्धशतकांसह 2380 धावा केल्या आहेत. थॉर्प यांनी 2005 मध्ये न्यू साउथ वेल्सचे प्रशिक्षकपद भूषवले आणि त्यानंतर त्यांना इंग्लंड लायन्सचे प्रशिक्षक बनवण्यात आले. 2013 च्या सुरुवातीस थॉर्प इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-20 संघांचे फलंदाजी प्रशिक्षक बनले. त्यानंतर 2020 मध्ये त्यांना पाकिस्तान विरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनवण्यात आले होते. 2022मध्ये ते अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक बनले होते. परंतु, हे पद स्वीकारण्यापूर्वीच ते एका गंभीर आजाराला बळी पडले होते.

Exit mobile version