| मुरूड जंजिरा | वार्ताहार |
मुरुड तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरिश्चंद्र मल्हारी तरे वय- 74) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले. तरे नांदगावच्या कोळी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक होते. त्यांच्या पश्चात पत्नी द्रौपदी, दोन मुले व दोन विवाहित मुली,तीन भाऊ नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड .इस्माईल घोले, तालुकाध्यक्ष सुभाष महाडिक, उपाध्यक्ष अस्लम हलडे आदींनी शोक व्यक्त केला.







