लाडकुबाई बाळू मोहिते यांचे निधन

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील दादर पाडा येथील राहणाऱ्या लाडकुबाई बाळू मोहिते यांचे वृद्धपकाळाने वयाच्या 93 वर्षी शनिवारी (दि.23) निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. लाडकुबाई बाळू मोहिते यांचे दशक्रिया विधी सोमवार (दि.1) एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता भोम खाडी येथे होणार असून तेरावे गुरुवार (दि.4) एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता राहत्या घरी दादर पाडा येथे होणार आहे.

Exit mobile version