कर्नाळा अभयारण्यात माकडांची दहशद

| पनवेल | वार्ताहर |

मागील तीन महिन्यांपासून कर्नाळा बर्ड्स सेंचुरीमध्ये पर्यटकांची संख्या घटली होती. मात्र, शाळेला लागलेल्या सुट्ट्या आणि उन्हाळी वातावरणामुळे पर्यटक पुन्हा जंगलाकडे वळायला लागले आहेत. मात्र, येथे येणार्‍या पर्यटकांना माकडे त्रास देत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाढत्या गर्मीमुळे महामार्गावर कोणीही गाड्या थांबवत नसल्याने माकडांनी आपला मोर्चा बर्ड्स सेंचुरीकडे वळवला आहे. मोठमोठ्या टोळ्या जंगलात वाढत आहे. त्याचा फटका त्यातील काम करणारे कर्मचारी आणि अधिकार्‍यांना बसत आहे. दोन आठवड्यांपूर्वी एका माकडाने गेट वर असलेल्या वनपालावर हल्ला करुन त्यांना जखमी केले होते. त्यामुळे अधिकारी तसेच कर्मचारी या टोळ्यांना घाबरत आहेत. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी वनखात्याने तातडीने पावले उचलणे महत्त्वाची ठरणार आहे.

Exit mobile version