उपचारादरम्यान इसमाचा मृत्यू

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

नरेश सकपाळ असे या मृताचे नाव आहे. ते धसाडे कुणे येथील रहिवासी आहेत. झाडावरून पडल्याने ते जखमी झाला होते. 14 डिसेंबरला त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मंगळवारी दुपारी नेले होते. मात्र, त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा उपचारासाठी अतिदक्षता विभागात तातडीने दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे नातेवाईकांनी तेथील डॉक्टरांबाबत संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नरेश सकपाळ यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी नेले होते. मात्र त्यांना सतत फीट आली. त्यामुळे शस्त्रक्रिया न करता तातडीने अतिदक्षता रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचाराच्यावेळी त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.

Exit mobile version