राम विठ्ठल लाड यांचे निधन


| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावचे रहिवासी तथा कृष्णादेवी प्रासादिक भजन मंडळाचे माजी अध्यक्ष राम विठ्ठल लाड (अण्णा) यांचे सोमवार, दि. 25 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास निधन झाले. निधनसमयी ते 84 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. चौल पंचक्रोशीतील प्रसिद्ध पेंटर दीपक लाड (आप्पा) यांचे ते वडील होत. लाड यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. 26) सकाळी 10 च्या सुमारास चौलमळा येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, नातवंडं असा मोठा परिवार आहे. राम लाड यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन परिवाराचे सांत्वन केले.

यावेळी चौलमळा गावाचे प्रमुख रवींद्र घरत, जितेंद्र पाटील, खजिनदार अल्पेश घरत, रवींद्र नाईक, प्रशांत आमरे, मंडळ अध्यक्ष महेंद्र नाईक, रेवदंडा अर्बन बँकेचे माजी चेअरमन वामन घरत, माजी गावप्रमुख सुनील घरत, अनिल नाईक, अनंत घरत, दत्तात्रेय जाधव, अशोक म्हात्रे, जनार्दन नाईक आदी मान्यवरांनी कै. राम लाड यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. लाड यांचे दिवसकार्य बुधवार, दि. 3 जानेवारी 2024 रोजी, तर उत्तरकार्य शुक्रवार, दि. 5 जानेवारी 2024 रोजी राहत्या घरी होणार आहेत, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.

Exit mobile version