रामचंद्र कांबळे यांचे निधन

| पाली /बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील पंचशील नगर खवली येथील रामचंद्र गंगाराम कांबळे (84) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. ते निवृत्त मुख्याध्यापक होते. तसेच बौद्धजन पंचायतीचे माजी अध्यक्ष देखील होते. त्यांच्या पश्चात चार मुले व तीन मुली असा परिवार आहे. यांचा जलदान विधी व शोकसभा कार्यक्रम रविवारी (दि.21) सकाळी 11 वाजता राहत्या घरी पंचशील नगर खवली येथे बौद्धजन पंचायत ग्रुप नंबर पाचच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी बौद्धाचार्य अशोक वाघमारे व अध्यक्ष अरुण शिंदे यांच्यासह नातेवाईक, ग्रामस्थ व मित्रपरिवार उपस्थित असणार आहेत.

Exit mobile version