आश्रमशाळेतील शाळकरी मुलाचा मृत्यू

| पालघर | प्रतिनिधी |

घानवळ आश्रमशाळेतील एका शाळकरी विद्यार्थ्यांचा जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोंदे आश्रमशाळेत नववीत शिकणारा विद्यार्थी राहुल मधुकर दिवे (16) याला सोमवारी (दि.5) ताप, खोकला, कंबरदुखीचा त्रास होऊ लागल्याने जवळच्या मोऱ्हांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला इंजेक्शन व गोळ्या औषध देऊन आश्रमशाळेत पाठवण्यात आले होते. परंतु, दुसऱ्या दिवशीही त्याची प्रकृती ठीक नसल्याने पुन्हा मोऱ्हांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. परंतु, तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे दाखल करण्यास सांगितले व तेथे त्याचे ब्लड, एक्सरे व थुंकीची तपासणी केली असता त्याला निमोनिया झाला असल्याचे निदर्शनास आले होते.

यानंतर बुधवारी (दि.7) त्याला त्याच्या आईच्या सांगण्यावरून घरी सोडण्यात आले असल्याचे शिक्षकांनी सांगितले. दोन दिवसानंतर शुक्रवारी (दि.9) जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्व संध्याला त्यांचा मृत्यू झाल्याची घटला घडली. परंतु, हि दुर्घटना शिक्षकांच्या दुर्लक्षित कारभारामुळे घडली असून माझ्या मुलाची तब्येत अधिक ढालळल्यानंतर त्यांनी आम्हाला कळवले असल्याचे मृत राहुलच्या आईने सांगितले.

Exit mobile version