शरश्‍चंद्र ठाकूर यांचे निधन

। चिरनेर । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील चिरनेर मुळपाडा येथील शरश्‍चंद्र हरिश्‍चंद्र ठाकूर (63) यांचे बुधवारी (दि.14) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर चिरनेर येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पक्षात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, आई-वडील, भाऊ, बहिणी, पुतणे, जावई, नातवंडे असा आप्त परिवार आहे.

शरश्‍चंद्र ठाकूर हे इगतपुरी नाशिक येथे महेंद्र अँड महेंद्र कंपनीत कामाला होते. वयोमानानुसार ते निवृत्त झाले होते. कंपनीतील कामाच्या अनुभवामुळे ते कंपनीच्या कामासाठी देशात अनेक ठिकाणी गेले आहेत. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवारी (दि.23) श्रीक्षेत्र नाशिक येथे होईल. तर उत्तरकार्य विधी रविवारी (दि.25) चिरनेर मुळपाडा येथील राहत्या घरी दुपारी 12 वाजता होणार असल्याची माहिती ठाकूर परिवारातर्फे देण्यात आली.

Exit mobile version