ताम्हिणी घाटात बुडून तरुणाचा मृत्यू

| पुणे | वृत्तसंस्था |

लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना रविवारी (दि. 30) घडली होती. ही घटना ताजी असतानाच ताम्हिणी घाटात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. स्वप्नील धावडे असे वाहून गेलेल्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा तरुण आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो धबधब्यात उडी मारताना दिसत आहे. त्यानंतर तो दगडाला पकडून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला त्यात यश आले नाही. पुढे पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहत गेला.

Exit mobile version