अमानुष मारहाणीत तरुणीचा मृत्यू

| कोल्हापूर | वृत्तसंस्था |

लिव्ह इनचा पर्याय कुटुंबीयांना न आवडल्याने बेदम मारहाणीत तरुणीचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. या घटनेने एकच थरकाप उडाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शनिवार पेठेतील केदारलिंग प्लाझामध्ये राहणारी उच्चशिक्षित असलेली वैष्णवी लक्ष्मीकांत पवार (वय 24) एका बँकेमध्ये नोकरीला होती. तिच्या मनमिळावू स्वभावामुळे तिच्या मित्रांमध्ये चांगलीच परिचित होती. ती शहरामधील एका ढोल ताशा पथकाची सदस्यसुद्धा होती. मात्र ती काही दिवसांपूर्वी नोकरी सोडून पुण्यामध्ये एका मित्रासोबत राहत असल्याची आईला माहिती मिळाली. त्यामुळे विचारणा केल्यानंतर मित्रासोबत लिव्ह इनमध्ये राहणार असल्याची माहिती आईला दिली. मात्र, आईला मुलीचा विचार पटत नसल्याने त्यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार दोघांना वेगळे करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील देवठाणेमध्ये वैष्णवीला घेऊन जात रात्रभर काठी, गज आणि दोरीने  बेदम मारहाण आई शुभांगी पवार, भाऊ श्रीधर पवार आणि मामा संतोष आडसूळ या तिघांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी रक्त साखळल्याने रात्रभर तळमळत होती. तिच्या हात, पायावर गंभीर दुखापत झाली होती. सकाळी पोटात दुखू लागल्याने वैष्णवी बेशुद्ध झाली. तिला दसरा चौकात खासगी रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी तरुणीची आई, भाऊ आणि मामा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version