| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 274 पर्यंत वाढली आहे. विमान कोसळून जमिनीवर जखमी झालेल्या आणखी काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तसेच ज्याठिकाणी विमान कोसळले तिथे स्फोट होऊन काहींचा मृत्यू झाला होता. ही संख्या आता 33 वर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 274 वर पोहोचला आहे. लंडनच्या गेटवीक विमानतळाकडे झेपावलेले विमान फ्लाइट एआय 171 हे गुरूवारी उड्डाण केल्याच्या अवघ्या काही मिनिटांमध्येच अहमदाबादच्या बीजे मेडिकल हॉस्टेल आणि कॅन्टीनच्या इमारतीवर कोसळलं होतं. यानंतर प्रशासनाकडून या दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले होते.






