क्रिकेट खेळताना मृत्यू

| शिरगाव | वार्ताहर |

मावळ तालुक्यातील दारुंब्रे गावातील उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून लोकप्रिय असणाऱ्या मिलिंद वसंत भोंडवे यांचे सांगवी येथे शुक्रवारी (दि.24) क्रिकेट खेळत असताना मैदानावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या आकस्मिक घटनेने भोंडवे कुटुंबावर आणि दारुंब्रे गावावर शोककळा पसरली आहे. पिंपरी-चिंचवडमधील सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा शुक्रवारी तिसरा दिवस होता. दुपारी मिलिंद भोंडवे यांच्या संघाचा सामना सुरू होता. त्या सामन्यामध्ये मिलिंद गोलंदाजी करत होते. गोलंदाजी करत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते मैदानावर कोसळले. सर्व सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Exit mobile version