। मुंबई । प्रतिनिधी ।
छत्रपती संभाजी महाराज यांचा गौरवशाली शौर्याचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचविण्या करिता पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडबद्रुक या गावी महाराजांनी आपला देह ठेवला त्याच परिसरात त्यांचे जागतिक दर्जाचे भव्य दिव्य स्मारक बांधण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे असे विधान परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर केले.
या स्मारकासाठी सरकारने 150 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोत्कृष्ट आराखडा तयार करण्यासाठी स्पर्धात्मक निविदा मागविण्यात येणार आहेत.असे हि अजित पवार यांनी सांगितले. राजगडाच्या पायथ्याशी संभाजी महाराज यांच्या मातोश्री सईबाई यांच्या स्मारकाचा जिर्णोद्वार करावा असे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले .त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या स्मारकासाठी निधी देण्यात येईल अशी ग्वाही दिली.