कर्जत रेल्वे स्थानकावर डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्याचा निर्णय

। नेरळ । वार्ताहर
कर्जत रेल्वे स्थानकात मेल एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविणात यावेत यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडे गेल्या दोन वर्षे पाठपुरावा सुरू होता.रेल्वे समस्या सोडविणारे कार्यकर्ते पंकज ओसवाल यांच्या मागणीला यश आले असून 2021-22 मध्ये सदर कामाची मंजुरी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिली आहे.

कर्जत स्थानकात मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी आरक्षण केल्यानंतर गाडी पकडण्यासाठी स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.कर्जत रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाड्याच्या बाबतीत डब्यांची स्थिती दर्शविणारे इंडिकेटर नाहीत.स्थानकात छोटे डिजिटल इंडिकेटर्स बसविण्यात यावेत अशी मागणी रेल्वे समस्या सोडविणारे कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांच्याकडून गेल्या दोन वर्षापासून रेल्वे प्रशासनाकडे केली जात होती.या बाबतीत रेल्वे प्रशासना कडून काहीच कार्यवाही होत नसल्याने ओसवाल यांनी आंदोलनाचा इशारा कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे वतीने दिला होता.
रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांच्याकडून सुरू असलेला पाठपुरावा आणि पॅसेंजर असोसिएशनची भूमिका लक्षात घेऊन फलाट क्रमांक एकची लांबी वाढविल्यानंतर तेथे गाड्यांची स्थिती दर्शविणारे इंडिकेटर्स बसविण्यात येईल असे कळविले आहे.रेल्वे प्रशासनाकडून आर्थिक वर्ष 2021 – 22 मध्ये या कामाची मंजुरी मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिली आहे. या कामाच्या बाबतीत खर्चाचे अंदाजपत्रक करण्याचे काम सुरू केले आहे.
पंकज ओसवाल-रेल्वे अभ्यासक –
कर्जत रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाड्याच्या बाबतीत डब्यांची स्थिती दर्शविणारे छोटे डिजिटल इंडिकेटर्स लवकरच बसविण्यात आल्यावर कर्जत स्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची गैरसोय लवकरच दूर होईल.

Exit mobile version