कृषी विद्यापीठाचा शुल्क कपातीचा निर्णय

| मुंबई | प्रतिनिधी |
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी जाहीर केला आहे. या निर्णयामुळे या 4 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील 38 शासकीय आणि 151 विनाअनुदानित अशा एकूण 189 कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या 45 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील, पालक यांचा करोनामुळे मृत्यू झाला असेल अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण शुल्कात सूट देण्याचा निर्णयही कृषीमंत्र्यांनी घेतला आहे.

Exit mobile version