आज फैसला! ‘राष्ट्रवादी’ कोणाची?

| मुंबई | प्रतिनिधी |
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात असले तरी नेमके आकडे कोणीच सांगत नाही. मोजके आमदार आणि नेते सोडले तर बहुतांश पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहावे की अजितदादांसोबत जावे, असा पेच निर्माण झाल्याने अनेकांच्या तोंडून थेट राजकारण सोडण्याचीच भाषा बोलली जाऊ लागली आहे. अजित पवार बैठकिला पोहोचले असून या बैठकित 23 आमदार असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. तर अजित पवार यांचे कट्टर समर्थक देवेंद्र भुयार शरद पवार यांच्या बैठकिला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. आजच्या बैठकिनंतरच अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, हे आज स्पष्ट होणार आहे.

कोणाकडे जायचे, हे ठरविताना आमदार आणि पदाधिकारी काही निकष लावत आहेत. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यावर मतदारसंघात कमी निधी मिळत असल्याने कामे रखडली आहेत. ती मार्गी लावण्यासाठी अजितदादा यांच्यासोबत जावे. वर्षभरात होतील तेवढी कामे करून घ्यावीत, असा एक विचार आहे. तर दुसरीकडे कामे होतील न होतील पण अजितदादांसोबत न गेल्यास त्रास दिला जाण्याची शक्यता आहे. या अनामिक दहशतीलाही काही जण घाबरत आहेत.

आपण स्थापन केलेल्या पक्षात झालेल्या उलथापालथींमुळे खचून न जाता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उलट जोमाने उभे राहिल्याचं चित्र दिसत आहे. आगामी काळातील राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा आपणच असल्याचं शरद पवारांनी अगदी आत्मविश्वासाने सांगितलं, तेही पुतण्या अजित पवार यांनी बंड केल्याचं वृत्त येऊन जेमतेम दोन-तीन तास झाले असतानाच. अजित पवारांच्या नेतृत्वातील बंडानंतर छगन भुजबळ, प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते दुरावल्यानंतर मंगळवारी शरद पवारांनी पक्षउभारणीचे नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. अनुभवी राजकारण्यांचा सामना करण्यासाठी पवारांनी तरुण पिढी घडवण्याचे ठरवले आहे. पवारांनी प्रामुख्याने चार चेहरे हेरुन त्यांना वारसदार म्हणून घडवण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा असलेल्या 31 वर्षीय सोनिया दुहान यांना नवी दिल्लीतील पक्षाच्या कार्यालयाचा प्रभारी बनवत पवारांनी आता तरुण पिढीवर विश्वास दाखवत असल्याचे संकेत दिले. 2019 मध्ये अजितदादांनी बंड केलेले, तेव्हा सोनिया दुहान यांनी दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, कळवणचे आमदार नितीन पवार आणि शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांना गुरुग्राममधील हॉटेलमधून मुंबईत परत आणले होते.

हा निर्णय पवार साहेबांचा तरुण पिढीवर असलेला विश्वास दर्शवतो. त्यांची निराशा न करण्याची माझ्यावर मोठी जबाबदारी माझ्यावर आहे.असं सोनिया दुहान म्हणाल्या. मी उत्तर भारतावर लक्ष केंद्रित करत राष्ट्रवादीची उपस्थिती वाढवण्याकडे लक्ष देईन. मी पुढील वर्षी हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार आहेफफ असंही सोनिया म्हणाल्या.

Exit mobile version