जांभूळपाडा आदिवासी बैठकीत समाजहिताचे निर्णय

। उरण । वार्ताहर ।
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे तयार करण्यासाठी नवीन रेशनकार्डवर धान्य आणि घरपट्टी तातडीने मिळण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि गट विकास अधिकारी निलम गाडे यांना विनंती अर्ज करण्याचे उरण सामाजिक संस्थेच्या आयोजित जांभूळपाडा येथील आदिवासी बांधवांच्या बैठकीत ठरले. यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

तहसीलदार भाऊसाहेब अंधारे,तहसील कार्यालय,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण आणि उरण सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या मोहीमे अंतर्गत 300 जातीचे दाखले,500 नवीन रेशन कार्ड,1000 रेशन कार्ड अद्ययावत करणे, 500 बँक पास बुक, 200 मतदानाचे कार्ड काढण्यात आले आहेत.

आदिवासी बांधवांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी,प्रत्येक वाडी वरील सुशिक्षित दोन पुरुष आणि दोन महिला प्रतिनिधी यांना संघटित करून भविष्यात सर्व जबाबदार्‍या त्यांच्याकडे सुपूर्द करण्याच्या हेतूने, चिरनेर जंगल सत्याग्रहात विरमरण आलेल्या नाग्या महादू कातकरी यांच्या नावाने उरण तालुक्यातील पहिली सामाजिक संस्था बनविण्याचे सर्वानुमते ठरले, जी संस्था भविष्यात सर्व आदिवासी बांधवांना एक आधार असेल आधार कार्ड,बँक पास बुक, मतदानाचे कार्ड,पॅन कार्ड,गॅस कनेक्शन,जातीचे दाखले तयार करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यातील कातकरी बांधवानकडेच निश्‍चित केली. सदर बैठकीस राजेंद्र मढवी,संदीप कातकरी,दत्ता गोंधळी,नामदेव ठाकूर,विश्रांती म्हात्रे,किरण कातकरी,सुनील नाईक,दशरथ कातकरी,आशीर्वाद कातकरी,दीपक कातकरी,विष्णू कातकरी, सचिन कातकरी, मनीष कातकरी, रवी कातकरी उपस्थित होते.

Exit mobile version