। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेला करोनाच्या दुसर्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसत आहे. समोर येणारी आकडेवारी तर असेच संकेत देत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या दैनंदिन आकडेवारीनुसार, करोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येतही गेल्या काही दिवसांपासून चढउतार दिसून येत आहे.
गेल्या 24 तासांमध्ये देशात 33 हजार 376 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या तीन लाख 91 हजार 516 झाली आहे. तर काल दिवसभरात 32 हजार 198 रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन कोटी 23 लाख 74 हजार 497 वर पोहोचली आहे.