नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गेल्या 24 तासांत देशात 26,115 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 9 हजार 575 वर पोहोचली. तर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं चित्र आहे. याच कालावधीत 252 जण मृत्युमुखी पडल्याने मृत्यूंचा एकूण आकडा 4,45,385 इतका झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.