रायगडसाठी 14 रुग्णवाहिका मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
स्वदेस फाउंडेशन ने रायगड व नाशिक जिल्ह्यासाठी देणगी दिलेल्या 14 रुग्णवाहिकांचेे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी मुंबई येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यामध्ये स्वदेस फाउंडेशनच्या ग्रामविकास व कोविड प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले कार्यक्रमासाठी स्वदेस फाऊंडेशनचे प्रमुख रॉनी स्क्रूवाला, झरीना स्क्रूवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, संचालक रंजिश कट्टडी, उपसंचालक तुषार इनामदार , महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्र यादव व 108 बी.वी.जी ग्रूप चे अधिकारी उपस्थित होते. स्वदेस फाउंडेशन च्या वतीने रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यामध्ये या अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा म्बुलन्स मिळाल्यामुळे गरजू रुग्णांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा मिळू शकणार आहेत, असे स्वदेश चे उपसंचालक श्री.तुषार इनामदार यांनी म्हटले आहे.

Exit mobile version