आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेकापक्षाच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यातर्फे रामराज विभागातील नागरिकाच्या सेवेसाठी रुग्णवाहिका भेट देण्यात आली. या रुगणवाहिकेचे लोकार्पण चित्रलेखा पाटील यांनी फणसापूर केले. यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर तेलगे, तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी सभापती प्रिया पेढवी, अरुण भगत, सुभाष वागळे, धर्मा लोभी, बाळू पाटील, हर्षदा मयेकर, विक्रांत वार्डे, मोहन धुमाळ आदी उपस्थित होेते.

यावेळी महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आतापर्यंत शेकापच्या माध्यमातून 9 कोटीं रुपयांचे खर्च सर्व सामुग्री, अन्नधान्य वाटपातून केला गेला आहे. 2 लाख गरजूंना अन्न धान्य वाटप करण्यात आले. चळवळीची बांधीलकी असल्याची शिकवण लाल बावटयाची आहे. रुग्णवाहीकेची सेवा देताना पक्ष, राजकारण न बघता करण्याची सुचना यावेळी चित्रलेखा पाटील यांनी केली. आपले काम सेवेचे, कष्टकर्‍यांसाठीचे आहे हे कायम लक्षात ठेवा. लोकांचे काम होणे महत्वाचे आहे. भविष्यात महिलांना चालक प्रशिक्षण देण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच तालुक्यात अद्यावत क्रीडा संकुल उभारण्याात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी रुग्णवाहिकेसाठी मोहन धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जाहिर करण्यात आली. या समितीच्या वतीने रुग्णवाहिका चालविण्यात येणर असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version