रुग्णवाहिकेचे लोकार्पण

| महाड | वार्ताहर |

महाड औद्योगिक वसाहतीमधील विनंती ऑर्गनिक लिमिटेड कंपनी, मिसेस कविता विनोद सराफ फाउंडेशन मुंबईतर्फे किल्ले रायगड विभागातील नागरिकांकरीता रुग्णवाहिका देण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका जनसंवाद रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड वेल्फेअर असोसिएशन या संस्थेकडे देण्यात आली असून मंगळवारी कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक महेश पुरोहित यांच्या हस्ते रुग्णवाहिकेच लोकार्पण करण्यात आले. यावेळी रायगड पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
ऐतिहासिक किल्ले रायगडावर दरवर्षी लाखो पर्यटक शिवभक्त येत असतात शिवाय शैक्षणीक सहली देखील मोठ्या प्रमाणात येतात. यापूर्वी अनेकजण गड चढताना किंवा उतरताना अपघात झाले आहेत. किल्ल्याच्या परिसरात असलेल्या वाडी वस्त्या दुर्गम भागात आहेत. यामुळे त्यांना पाचाड किंवा महाड येथे उपचारासाठी दाखल व्हावे लागते. याकरिता खासगी वाहनांशिवाय पर्याय नव्हता. ही गरज जनसंवादचे अध्यक्ष निलेश पवार यांनी जाणून घेत कंपनीकडे रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून मागणी केली. कंपनी व्यवस्थापनाने देखील ही मागणी सकारात्मक दृष्टीने मान्य करत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

याप्रसंगी कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक महेश पुरोहित, निलेश पवार , चंद्रकांत कोकणे, उदय सावंत, मिलिंद माने, प्रभाकर सावंत, कमलेश कोरपे, अमर सावंत, दिलीप मुजुमले, प्रभाकर शिंदे, शेखर पाटील, संतोष गायकवाड, देविदास गायकवाड, लामजे, इस्माईल हूर्जुक, शिवाजी पिसाळ, कंपनीचे अधिकारी कुलकर्णी, कृष्णा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version