नेरळ | प्रतिनिधी |
आमदार महेंद्र थोरवे यांच्या आमदारनिधीच्या माध्यमातून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नवीन कोविड वॉर्ड तसेच अत्यवस्थ रुग्ण आणि गरोदर महिला-बाळंतपण झालेल्या महिला यांच्यासाठी आवश्यक असलेली रक्तपेढी सुरु झाली आहे.. त्या 50 बेडची क्षमता असलेल्या नवीन अत्याधनिक सुविधा यांनी सज्ज असलेल्या वॉर्डाचे आणि रक्तपेढीचे लोकार्पण आमदार थोरवे यांचे हस्ते फिट कापून करण्यात आले.
त्यावेळी कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी,आरोग्य उपसंचालक डॉ गौरी राठोड,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने, प्रांत अजित नैराळे, तहसीलदार विक्रम देशमुख,नायब तहसीलदार एस आर बाचकर,कर्जत पालिकेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील,कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज बनसोडे,कशेळे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ विक्रम खंदारे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांच्यसह सुनील गोगटे, पंकज पाटील,कर्जत पालिकेतील स्वीकृत नगरसेवक संकेत भासे,अनेक मान्यवर उपस्थित होते.