। श्रीवर्धन । वार्ताहर ।
तीन गावची ग्रामदेवता शिस्ते कपोली भावे आई जाखमाता शिस्ते गावाच्या उंच डोंगरी वसलेल्या आगरी कोळ्यांच्या हाकेला धावणारी माता अशी ओळख असलेली माऊली मंदिराच्या पायथ्याशी भव्य दिव्य अश्या उभारलेल्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन युवा नेते अर्णव पाटील यांच्या हस्ते फित कापून तसेच माजी.आमदार पंडित शेट पाटील यांनी श्रीफळ फोडून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी उपस्थित माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनी सांगितले की जाखमात माउली चे हे श्रद्धास्थान खरोखरच जागृत देवस्थान आहे या मंदिराच्या प्रवेद्वाराचे कार्य आमच्या मातोश्री सुलभा काकू यांचा स्मरणार्थ ही वास्तु उभारण्याच आहे हे काम आमच्या परिवाराला मिळालं हे आमचं भाग्य आहे.तसेच या मंदिराच्या आवारात आणखी चांगले कार्य आपण करत राहू. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देन्यात आले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित शेट पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया पाटील, जि.प सदस्या भावना पाटील, शैला पाटील, श्रीवर्धन तालुका चिटणीस वसंत यादव, संतोष पाटील, गौरी पयेर, स्वप्निल बिराडी, निलेश मेंडाडकर, प्रमोद नाक्ती, अमीत पाटील,तीन गाव देवुळ ट्रस्ट अध्यक्ष योगेश धुमाळ, शशिकांत सुखदरें, दत्तात्रेय भायदे, गजानन चाळके, चंद्रकांत चाळके, रमेश घरत, संजू पाटील, परशुराम पाटील, नाना मोहिते, प्रशांत पाटील तसेच तीन गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ लहान थोर मंडळी उपस्थित होते.