। उरण । वार्ताहर ।
पनवेल येथील नेत्रतज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ महाडच्या माध्यमातून नेत्रचिकित्सा केंद्राचे लोकार्पण मुकेश तनेजा डिस्ट्रीक्ट फस्ट व्हाईस गव्हर्नर आणि शोभा सावंत अध्यक्ष अण्णासाहेब सावंत अबर्न बँक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे नानक राजानी, डॉ.गौतम पवार, डॉ. चंद्रशेखर दाभाडकर व डॉ.सुजाता दाभाडकर, लायन्स क्लब ऑफ महाडचे अध्यक्ष रोशन गुजर, कैलास जंगम, गिरीश पयेलकर, बाबुलाल जैन, दीपक शेठ, अनंत सुकले आदी मान्यवर उपस्थित होते. नेत्रचिकित्सा केंद्राचे लोकार्पण झाल्यानंतर या केंद्रावर 59 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या केंद्रामध्ये अत्यंत माफक दरामध्ये संपूर्ण नेत्र तपासण्या करण्यात येतील. तसेच तपासणी नंतर चष्मे सुद्धा माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.