नागावमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण

माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते उद्घाटन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शुक्रवार, दि.9 जुलै रोजी विविध ठिकाणी अनेक विकासकामांचे लोकार्पण माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यात 15 टक्के मागासवर्गीय निधीतून 10 ठिकाणी सोलर स्ट्रीट लाईट व 14 वा वित्त आयोग निधीतून ग्रामपंचायत महिला व्यायामशाळेमध्ये नवीन जीम साहित्य व बुरूड आळी येथे महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह या सर्व कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्यासह सरपंच निखिल मयेकर, उपसरपंच रसिका प्रधान, ग्रामविकास अधिकारी श्‍वेता कदम व ग्रामपंचायत सदस्य राकेश म्हात्रे, श्रीकांत आठवले, मंगला नागे, आदेश मोरे, हर्षदा मयेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्वत्र सोलर स्ट्रीट लाईट बसविणार
सद्यःस्थितीत ग्रामपंचायत नागावने सोलर स्ट्रीट लाईट बसवून एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. लवकरच ग्रामपंचायत हद्दीतील सर्व स्ट्रीट लाईट सोलर बेस करून घेण्यासाठी ग्रामपंचायत नागाव प्रयत्नशील आहे, जेणेकरून भविष्यात पुन्हा स्ट्रीट लाईट कोणत्याही कारणांमुळे बंद राहणार नाहीत, असा विश्‍वास यावेळी सरपंच निखिल मयेकर यांनी व्यक्त केला.

Exit mobile version