। मांदाड । वार्ताहर ।
राज्यातील कोळी समाज आज ही प्राथमिक सुविधांपासून वंचित असून पाणी,वीज आणि प्राथमिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोळी समाज एकसंघ ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य रमेश पाटील यांनी मांदाड जि. रायगड येथे केले. रमेश पाटील यांच्या आमदार फंडातून मांदाड कोळीवाड्याला 50 हजार लिटर पाणीपुरवठा करणार्या टाकीचे लोकार्पण कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके ,चेतन पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.मांदाड या आदिवासी कोळी समाज बहुल असलेल्या समाज बांधवांना पाण्याचे मोठे दुर्भिक्ष होते. अरुंद आणि चढणीचा रस्ता दूरवरून हंड्याने पाणी घेऊन येणार्या कोळी भगिनींचे कष्ट रमेश दादा यांच्या तौक्ते वादळ पाहणी दौर्यात लक्षात आल्यावर त्यांनी पाणी पुरवठा करणारी यंत्रणा उभी करण्याचे आशवासन दिले होते. त्या अनुषंगाने आज 50 हजार लिटर पाणी पुरवठा करणारी टाकी लोकार्पण केली.