| अलिबाग | प्रतिनिधी |
आविष्कार फाऊंडेशन संस्था कोल्हापूर यांच्यातर्फे नुकताच राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे पार पडला. सदर पुरस्काराने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली शाळेतील मुख्याध्यापिका दिपा फाळके यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






