दिपक पाटील यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

। रसायनी । वार्ताहर ।

कानसा वारणा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक गणपत पाटील यांचे सामाजिक कार्य पाहून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठाकडून गुजरात विसानगर येथे अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा आणि अखिल भारतीय कुर्मी पाटीदार महासभा यांच्यावतीने आयोजित 45 व्या महाअधिवेशनात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय कुर्मी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ निरंजनभाई पटेल, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेद्र पटेल, पुरुषोत्तम रुपाला, नितीन पटेल, डॉ मंगेश देशमुख,नरेशचंद्र काठोले, डॉ प्रकाश घवघवे, प्रमोद ठोंबे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version