। कोलकाता । वृत्तसंस्था ।
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या तिसर्या टी 20 सामन्यात भारताने विंडीजचा 17 धावांनी पराभव केला. भारताने वनडे पाठोपाठ टी 20 मालिकेत देखील व्हाईट वॉश दिला. मात्र तिसर्या सामन्यात भारताला एक धक्कस देखील बसला. भारताचा वेगवानी गोलंदाज दीपक चहरच्या मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. मात्र दीपकच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जचे देखील टेन्शन वाढणार आहे.
दीपक चहर वेस्ट इंडीज विरूद्धच्या तिसर्या टी 20 सामन्यात चांगल्या लयीत दिसत होता. त्याने सुरूवातीलाच विंडीजला दोन धक्के दिले होते. मात्र दुसर्या षटकातील शेवटचा चेंडू टाकत असताना त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला आणि त्याला मैदान सोडावे लागले. दरम्यान, संघ व्यवस्थापनाने त्याची दुखापत किती गंभीर आहे याची पहाणी करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
जर त्याचे हॅमस्ट्रिंग टिअर झाले असेल तर त्याला आयपीएलचे सुरूवातीचे काही सामने देखील खेळात येणार नाहीत. चेन्नई सुपर किंग्जने त्याला यंदाच्या हंगामात 14 कोटी रूपयांना पुन्हा विकत घेतले आहे. ग्रेड वन चे टिअर असले तर त्यातून सावरण्यासाठी जवळपास 6 आठवड्यांचा कालावधी लागतो. सध्या तरी दीपक चहर येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार्या श्रीलंकेविरूद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेला मुकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दीपक चहरला दुखापत
