दीपाली रोटकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान


| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

मुरूड येथील सर. एस. ए हायस्कूलच्या शिक्षिका दीपाली राजेंद्र रोटकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार रविवारी (दि. 10) वेलशेत, रोहा येथील कार्यक्रमात देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचे संकलनेतून आणि भारतीय एज्युकेशन विद्या संकुलाचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुक्यातील भारतीय एज्युकेशन विद्या संकुल वेलशेत येथे गुणवंत, कर्तृत्ववान गौरव पुरस्कार 2024 या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, संजोगजी वाघेरे-पाटील, विजय कदम, विष्णू पाटील, बबन पाटील, अनिल नवगणे, सुरेंद्र म्हात्रे, कल्पना पाटील, सुवर्णा जोशी, डॉ. स्वीटी गिरासे, स्नेहल जगताप, शिरीष घरत, सुरेश खैरे, आस्वाद पाटील, धनवंती दाभाडे, दिपश्री पोटफोडे, किशोर जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version